२०२०च्या जागतिक पाऊलखुणा – महा एमटीबी

 

 

अखेर २०२० सालच्या अंताकडे सर्व जण आलो आहोत. हे वर्ष कधी एकदा संपते आहे, याची यावेळी प्रत्येक जण अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. वर्षाच्या सुरुवातीला असलेला उत्साह अवघ्या दोन महिन्यांतच प्रथम उत्सुकता आणि नंतर भीती आणि नैराश्यात बदलला.

 

 

 

चिनी ‘कोविड’ विषाणूने खरोखरच संपूर्ण जगाला वेठीस धरले. या वर्षावर कोरोनाचा प्रभाव असला तरी अन्यही बर्‍याच घडामोडी घडल्या, त्यामुळे जग काही अगदीच ठप्प वगैरे झाले नाही. अमेरिकन निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला, रशियात पुतीन यांनी आपल्या तहहयात राजेशाहीवर ड्युमाचे शिक्कामोर्तब करवून घेतले, पाकिस्तान सालाबादाप्रमाणे आणखीच दिवाळखोरीच्या गर्तेत गेला, जाता जाता ट्र्म्प यांनी इस्रायल-अरब मैत्री घडवून आणली, चीनचे वाढलेले सामर्थ्य, त्याचा जगाला असलेला धोका आणि त्याविरोधात एकत्र येण्याच्या गरजेवर गांभीर्याने चर्चा सुरू झाली, भारताने पूर्व लडाखमध्ये चीनला तडाखा दिला, पुढे ‘क्वाड’मध्ये महत्त्वाची भूमिका बजाविली, तिकडे नेपाळमध्ये पुन्हा हिंदुराष्ट्राची मागणी पुढे येऊन सरकार बरखास्त झाले, कोरोनावरील लसीसाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न झाले आणि अवघ्या आठ ते नऊ महिन्यांच्या काळात लस विकसितही करण्यात आली. त्यामुळे जगाच्या इतिहासात नैराश्याचे, भीतीचे आणि अगदी धामधुमीचेही वर्ष म्हणून इसवी सन २०२० ची नोंद होणार आहे, यात कोणतीही शंका नाही.

 

 

विशेष म्हणजे, जाताजाता ‘कोविड’ विषाणूच्या बदलत्या स्वरूपाने २०२०ची छाया २०२१ वरही उमटली आहेच, त्यामुळे २०२१ हेही २०२० प्रमाणेच ठरू नये, अशी कामना जगभरातून करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षावर मोठा प्रभाव होता तो चिनी कोरोना विषाणूचा. म्हणजे सुरुवातीला केवळ चीनपुरताच मर्यादित असल्याचे भासविले गेलेला विषाणू कधीच जगभरात निर्यात करण्यात आला होता. चीनच्या वाढलेल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व करणार्‍या या विषाणूमुळे संपूर्ण जगाला हवे तेव्हा वेठीस धरू शकतो, असा इशारा चीनने दिला. अर्थात, एकप्रकारे ते चांगलेच झाले. त्यामुळे चीनविरोधी जागतिक जनमतही एकवटले. दुसरीकडे या नव्या रोगावर इलाज शोधण्यासाठी जगभरातील बहुसंख्य देश कामाला लागले, त्यातच भारतही आहे. अगदी युद्धपातळीवर काम करून अवघ्या आठ ते नऊ महिन्यांत कोरोनावरील लस शोधून काढण्यात यश आले आणि आता तर लसीकरणासही प्रारंभ झाला आहे.

READ  Le parti interessate affidano ai media l'uguaglianza di genere e il buon governo - Voice of Nigeria

 

 

कोरोनावगळता जागतिक राजकीय आघाडीवरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. आजपर्यंत अगदी अशक्यप्राय वाटणारी इस्रायल-अरब मैत्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घडवून आणली. विशेष म्हणजे, त्यानंतर इस्रायल आणि अरब देशही ही मैत्री दीर्घकाळ टिकावी, यासाठी मनापासून प्रयत्न करताना दिसत आहेत. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव हीदेखील एक महत्त्वाची घटना. कोरोना संक्रमणाने अमेरिकेत थैमान घालायला सुरुवात केल्यावरच ट्रम्प यांचे ग्रह फिरले होते. त्यामुळे बायडन यांना त्यांच्या पराभवासाठी फार काही करण्याची गरज भासली नाही. आता किमान चार वर्षे तरी ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार नाहीत. मात्र, आपल्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले निर्णय हे जगावर दीर्घकाळ परिणाम करणारे ठरणार आहेत. म्हणजे चीनला थेट आव्हान देणे आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी ‘क्वाड’ गटाला प्रोत्साहन देणे.

 

 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना संक्रमणाने अमेरिका आणि युरोपीय देशांच्या आरोग्य व्यवस्थेचे काढलेले वाभाडे. जगाची महासत्ता असलेल्या देशात दिवसाला किमान लाखभर माणसे मृत्युमुखी पडली. आम्ही मास्क वापरणार नाही, अशी आचरट आंदोलनेही अमेरिकेत झाली. दुसरीकडे अतिशय शिस्तप्रिय समजले जाणारे ब्रिटन, इटली, फ्रान्स हे देशही पूर्णपणे कोलमडले. ज्या देशांची आरोग्य व्यवस्था संपूर्ण जगात वाखाणली जात होती, ती व्यवस्था किती तकलादू आहे हे एका झटक्यात स्पष्ट झाले. त्याउलट भारतासारख्या देशाने (ज्या देशाला अजूनही तिसर्‍या जगातील राष्ट्र समजले जाते…) कोरोनाचे केलेले नियंत्रण, भारतीय समाजाने पाळलेली शिस्त (काही अपवाद वगळता) हे संपूर्ण जगासाठीच आदर्शवत ठरणारे आहे. त्यामुळे आता २०२१ मध्ये भारताची जागतिक अवकाशातील भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार, यात शंका नाही.

Lascia un commento

Il tuo indirizzo email non sarà pubblicato. I campi obbligatori sono contrassegnati *