शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या रिहानाचा गुगलवर भारतीय शोधत आहेत धर्म


नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्यासाठी सुरु असणाऱ्या आंदोलनाची दखल जगभरातील प्रसारमाध्यमांकडून घेतली जात आहे. त्यातच मंगळवारी शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दर्शवला आहे. ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात रिहानाने भाष्य केले आहे. कोणीही शेतकरी आंदोलनावर काहीच बोलत नसल्याची खंत रिहानाने व्यक्त केली होती.

तिने या आंदोलनाबद्दल सीएनएनच्या वृत्ताची लिंक शेअऱ करत चर्चा का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. तिच्या या ट्विटमुळे आता भारतीयांमध्ये तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येत आहे. विशेष म्हणजे रिहाना नक्की आहे कोण हे जाणून घेण्यासोबतच तिच्या धर्माबद्दल भारतीय सर्वाधिक सर्च करत असल्याचे गुगल ट्रेण्ड्समधून दिसून येत आहे. रिहाना मुस्लीम आहे का असा प्रश्न भारतीय नेटकरी गुगलवर सर्च करत असल्याचे गुगल सर्च ट्रेण्डमध्ये दिसत आहे.

रिहानाने दिल्लीच्या सीमेवरील भागात आंदोलन सुरु असणाऱ्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आल्याचा उल्लेख असणारे वृत्त शेअर केल्यानंतर तिच्यासंदर्भातील गुगल सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढले आहे. थेट ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात जगातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने भाष्य केल्यामुळे तिचे ट्विट जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. रिहानाच्या ट्विटनंतर लगेचच तिच्या नावासंदर्भात गुगल होण्याचे प्रमाण वाढले आहे. नेटकऱ्यांमध्येच तिच्या ट्विटवरुन दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. रिहानाने हा मुद्दा मांडल्याने अनेकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाची दखल घेतली जाईल, असे म्हटले आहे, तर रिहानाने हे ट्विट पैसे घेऊन केल्याचा आरोप या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी केला आहे. ज्या गोष्टीबद्दल रिहानाला काहीही माहिती नाही, त्याबद्दल तिने बोलू नये, असे मतही या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे रिहानाच्या ट्विटवरुन वाद सुरु असतानाच दुसरीकडे नक्की कोण आहे रिहाना, त्याबरोबरच तिचा धर्म कोणता आहे यासंदर्भात सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण अचानक वाढले आहे. गुगल सर्चमध्ये ‘Is Rihanna Muslim?’, ‘Rihanna religion’ या दोन वाक्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर भारतीयांकडून रिहानासंदर्भात केल्या जाणाऱ्या सर्चमध्ये तिची गाणी तसेच तिचा जन्म कुठे झाला आहे, यासंदर्भात सर्च करण्यात आल्याचे दिसत आहे.

READ  Modi in cui la tecnologia sta cambiando la protezione della fauna selvatica in Africa - LNN

Lascia un commento

Il tuo indirizzo email non sarà pubblicato. I campi obbligatori sono contrassegnati *