Le notizie più importanti

कोव्हॅक्सिनची कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका लवकरच मिळणार आपातकालीन सूचीत स्थान !

Data:


नवी दिल्ली – कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पण असे असले तरी या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेले नाही. पण यावर येत्या ४ ते ६ आठवड्यात निर्णय होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनी याबाबतची माहिती सेंटर फॉर सायन्स अँड इन्वायरमेंटने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सांगितली. याबाबतची सर्व आकडेवारी कोव्हॅक्सिनचे निर्माते भारत बायोटेक जागतिक आरोग्य संघटनेच्या पोर्टलवर अपलोड करत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना याचे परिक्षण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोव्हॅक्सिन संदर्भातील ९० टक्के दस्ताऐवज कोरोना लस निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने जागतिक आरोग्य संघटनेकडे जमा केले आहेत. पण अजूनही कोव्हॅक्सिनला अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि यूरोपियन यूनियनने आपातकालीन वापराची मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी भारत बायोटेककडून आणखी माहिती मागवली आहे. तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरु आहे.

यासाठी सर्व आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या नियामक विभागाकडे जमा करावी लागते. त्यावर तज्ज्ञ समिती आपला अध्ययन करत असतात. त्यात सुरक्षा, प्रभाव आणि उत्पादन गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते. भारत बायोटेकने याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आशा आहे की, येत्या चार ते सहा आठवड्यात कोव्हॅक्सिनला आपातकालीन सूचित स्थान मिळेल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले.

मॉडर्ना, फायझर, एस्ट्राजेनेका, जॉनसन (अमेरिका आणि नेदरलँडमध्ये), सिनोफार्मा/ BBIP आणि सीरम इन्स्टिट्यूटची भारतात तयार झालेल्या कोव्हिशिल्डचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपातकालीन सूचित समावेश आहे. पण कोव्हॅक्सिनला अद्यापही स्थान मिळालेले नाही.

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूदर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. मागच्या २४ तासात ५ लाख नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९,३०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही काय कोरोना कमी होण्याची लक्षणे नसल्याचे सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक घातक आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण कोरोनाच्या इतर व्हायरसमध्ये ३ एवढे असल्यामुळे डेल्टा व्हायरस किती घातक आहे? याचा अंदाज येतो, असेही त्यांनी सांगितले.

READ  6 deliziose ricette di sugo che ti faranno sbavare le labbra

articoli Correlati